Sushma Andhare : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी पुण्यात बंद पुकारण्यात आला होता .शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची (Pune Band) हाक देण्यात आली होती, यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानेही या बंदला पाठिंबा दिला. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या मोर्चात सहभागी झाल्या होत्या, यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा अंधारे यांचं राम कदम यांना आव्हान
भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. यावर बोलताना भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी असा भ्याड हल्ला करणाऱ्यांना घरात घुसून मारू असा इशारा दिला होता. राम कदम यांनी दिलेल्या या इशाऱ्यावर सुषमा अंधारे यांनी थेट आव्हान दिलं आहे. रामभाऊ आमचा अजिबात नाद करायचा नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आणखी रोष वाढावा यासाठी राम कदम आणि टीम देवेंद्र यांचं हे षडयंत्र असल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे. 


राम कदम तुम्हाला हे वाक्य परवडणारं नाही, पायाच्या दोन बोटात दगड पकडून मागच्या मागे माणूस आऊट करण्याची ताकद आमच्यात आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही, की घरात घुसू, अमूक करु आम्ही तुमचं घरसुद्धा घुसण्यासाठी ठेवणार नाही असा इशारा सुषमा अंधारे यांनी राम कदम यांना दिला आहे. 


हे ही वाचा : 'शी त्यांच्यावर काय बोलायचं...' आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात संपवला नितेश राणेंचा विषय


उदयनराजे यांना कोपरखळ्या
खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) पुणे बंदमध्ये सहभागी झाले होते, यावरुनही सुषमा अंधारे यांनी उदयनराजे यांना कोपरखळी लगावली आहे. उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायला आमच्यासोबत होते, त्यानंतर निषेध नोंदवायला ते येतील त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत बोलू शकू, पण ते इथं उपस्थित नाहीत, कदाचित महापुरुषांचा झालेला अवमान त्यांना सहन झालेला नसेल, आणि ते तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा द्यायला लगेच दिल्लीला गेले असतील असं आपण गृहीत धरू अशी कोपरखळी सुषमा अंधारे यांनी मारली. उदयनराजे यांच्याविषयी आमच्या मनात प्रचंड आदर आहे, ज्या अर्थी राजे इथे हार घालायला आले होते, त्या अर्थी महापुरुषांच्या अवमानप्रकरणी प्रसंगी राजे भाजपाचा राजीनामाही देतील, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी उदयनराजे यांना लगावला.


भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महारपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्यं केली जात आहेत. भाजपाल फक्त गोवळवलकर आणि हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नकोत. भाजपाला ऐकायचं नसेल तर आम्ही असं समजू की भाजप महापुरुषांच्या विरोधात आहे अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली आहे.