Maharastra Politics: शिवसेनेच्या `ब्रेकअप`ची पुढची सुनावणी `व्हॅलेंटाईन डे`ला, तारीख पे तारीख खेळ संपणार कधी?
Maharashtra Politics, Shiv Sena: शिवसेनेतील शिंदे-ठाकरे ब्रेकअपच्या सुनावणीसाठी आणखी महिनाभर थांबावं लागणार आहे. आज कोर्टात नेमकं काय झालं?
Shinde vs Thackeray: राज्यातल्या सत्तासंघर्षावर सहा महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. आज अवघ्या दोन मिनिटांच्या सुनावणीत कोर्टानं थेट पुढच्या महिन्यातली तारीख दिली आहे. 16 आमदारांचा अविश्वास ठराव आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव याभोवती प्रामुख्यानं ही सुनावणी फिरतेय. खुद्द मुख्यमंत्री शिंदेंच्या (Eknath Shinde) आमदारकीविरोधात ठाकरे (Uddhav Thackeray) गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. (Maharashtra Politics Shiv Sena symbol claim hearing before election commission know about argument by thackeray and shinde faction)
शिंदेंना घेरायचं, इतर 15 आमदारांना अपात्र ठरवायचं आणि सरकार अल्पमतात आणायचं अशी ठाकरेंची रणनीती असल्यामुळे प्रत्येक सुनावणीला महत्त्व आलंय. मात्र आता शिवसेनेतील शिंदे-ठाकरे ब्रेकअपच्या सुनावणीसाठी आणखी महिनाभर थांबावं लागणार आहे. आज कोर्टात नेमकं काय झालं?
आज कोर्टात काय घडलं?
ठाकरे गटाचे वकील अॅड. कपिल सिब्बल यांनी नबम राबिया केसवर युक्तीवाद करायचा आहे. त्यासाठी 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी केली. त्यावर एनसीटीचा विषय संपूर्ण आठवडा चालेल, त्यामुळे आपण तिसरा आठवडा किंवा 14 तारखेनंतरही चालेल? का असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, सिब्बल म्हटल्याप्रमाणे 14 फेब्रुवारी चांगला दिवस आहे, असं न्या. एम. आर शाह यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचा मुद्दा आपण 14 फेब्रुवारीपासून घेऊ आणि आसामचा मुद्दा त्यानंतर घेऊ, असं सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. त्यावर बोलताना हा मुद्दा मुळात किती जिवंत राहतो हे पाहावं लागेल, असं शिंदे गटाचे वकील अॅड. हरीश साळवे यांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकरणानंतर पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी होणार असल्याचं सरन्यायाधिशांनी सांगितलंय.
दरम्यान, सुप्रीम कोर्टातली यापूर्वीची सुनावणी 1 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबरला झाली होती. 13 डिसेंबरनंतर नाताळच्या सुट्ट्या असल्यानं सर्वोच्च न्यायायलायानं थेट 10 जानेवारी ही सुनावणीची तारीख जाहीर केली. सहा महिन्यांपासून राज्यातल्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. मात्र तारीख पे तारीख हा खेळ काही संपताना दिसत नाहीये.