Nashik : शिवसेना (Shivsena) नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्याला नाशिक (Nashik News) जिल्ह्यातून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. नाशिक, जालना, संभाजीनगरमध्ये ही यात्रा तीन दिवस सुरू राहणार आहे. सोमवारी दुपारी इगतपुरी तालुक्यातील मुंडे गाव येथून कार्यकर्त्यांशी संवाद करत आदित्य ठाकरे यांनी यात्रेला पुन्हा सुरुवात केली. मात्र त्याआधीच शिंदे गटाने (Shinde Group) ठाकरे गटाचा (Thackeray Group) करेक्ट कार्यक्रम केला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे 50 हून अधिक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरु असताना शिंदे गट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना धक्के देत आहे. आदित्य ठाकरे संवाद दौरे-मेळावे घेत असतानाही ठाकरे गटातून गळती सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.


आदित्य ठाकरे  यांच्या दौऱ्याआधीच नाशिकमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरास्ते यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित नाशिकमधील ज्येष्ठ शिवसैनिकांसह आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये 
शिवाजी पालकर, राजेंद्र घुले, गणेश शेलार, सोपान देवकर, रामभाऊ तांबे, भाऊसाहेब निकम, मंगेश दिघे, प्रशांत जाधव, राजेंद्र जोशी, विजय निकम, मयूर जोशी, रणजीत खोसे, निलेश शेवाळे, दौलत बाबू शिंदे, अमोल जोशी, नरेंद्र ढोले, सुनील चव्हाण, नामदेव पाईकराव, ओमप्रकाश अग्रवाल, शंकरराव खेलूकर, बाळू मुरलीधर टिळे, कचरू महादेव आवारे, हिरामण दामू धोंगडे, बाबुराव अमृता बोराडे, विठ्ठल सोनवणे, सदाशिव लांडगे, पांडुरंग पुंजा ताजनपुरे, बबन किसन बोराडे, भाऊसाहेब कोंडाजी आवारे, नामदेव हरी बोराडे, कचेश्वर पोपटराव ताजनपुरे, बाळू भोसले, पोपट बाबू सोमवंशी, महादू लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे, बापू रामा पाबळे, शंकर महादू शिंदे, अंबादास बाबुराव लोखंडे या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.