Ajit Pawar on Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं महायुतीत जागावाटपावरून मोर्चेबांधणी सुरू आहे.  लोकसभेचा स्ट्राईक रेट आणि जिंकून येण्याची क्षमता हेच जागावाटपाचं सूत्र असल्याचं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. जिंकून येण्याची क्षमता हा देखील जागावाटपाचा निकष असणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदेंनी स्ट्राईक रेटचा विषय काढल्यानं अजित पवार गट सावध झालाय. स्ट्राईकरेटचा निकष लावल्यास राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला खूप कमी जागा मिळू शकतात. त्यामुळेच आता राष्ट्रवादीनं 80 जागांचा आग्रह धरल्याची चर्चा सुरू आहे. 
राष्ट्रवादी अजित पवार गटाची बुधवारी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडणार आहे.  80 जागा लढवण्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आग्रह असणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.


जागावाटपाबाबत महायुतीत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. आमदारांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती अजित पवार जाणून घेणार आहेत.


पुढील 8 ते 10 दिवसात जागावाटपाचा निर्णय होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. लोकसभेतील स्ट्राईक रेटचा आधार घेत विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे. लोकसभेवेळी भाजपनं सर्व्हेंचा मुद्दा काढत शिंदेसेनेला जेरीस आणलं. आता शिंदे यांनी स्ट्राईक रेटचा मुद्दा चर्चेत ठेवून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अडचणीत आणल्याची चर्चा आहे...