ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस सर्वांचे कार्यकर्ते फोडा आणि महाराष्ट्रात... अमित शाह यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश
Maharashtra Politics : अमित शाहांनी शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असे आदेश दिले आहेत. नाशिकच्या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
Amit Shah In Maharashtra : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस सर्वांचे कार्यकर्ते फोडा असे वक्तव्य भाजपचे दिग्गज नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे. अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिलेल्या या आदेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौ-याचा दुसरा दिवस आहे. अमित शाह नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. अमित शाहांची नाशिकमधील डेमोक्रेसी हॉटेलमध्ये बैठक घेतली. नाशिक विभागाच्या 47 जागांचा आढावा अमित शाह यांनी घेतला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
महाराष्ट्रात सगळे विरोधी पक्ष आपल्या विरोधात उभे आहेत. आता त्यांना दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे ही निवडणूक ताकदीने लढवा. सगळ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीवर आहे. लोकसभेत विरोधी पक्षांनी जो नेरेटिव्ह सेट केलाय तो खोडून टाका. एकजुटीने महायुतीचे काम करा असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाशिकच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असं वक्तव्य देखील अमित शाह यांनी केले आहे.
मराठवाड्यातील 30 जागा महायुती जिंकेल
मराठवाड्यातील 30 जागा महायुती जिंकेल असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केलाय... संभाजीनगरमध्ये भाजपची बैठक झाली यावेळी अमित शाहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. तुम्ही कोणतीही चिंता करू नका, सर्व चिंता नेत्यांवर सोडू आणि तुम्ही कामाला लागा असं अमित शाहा म्हणाले तसेच 10 टक्के मतदान वाढवण्याच्या सूचना अमित शाहांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. तर देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.. तर विदर्भासाठी अमित शाहांनी मिशन 45 ठेवलंय त्यामुळे मराठवाडा 30 आणि विदर्भातील 45 जागा जिंकण्याचा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला..
संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली या बैठकीत मराठवाड्यासह राज्यातील जागावाटपावर चर्चा झालीय.. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बैठकीत उपस्थित होते.. चर्चा सकारात्मक झाल्याचा विश्वास एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी व्यक्त केलाय. लवकरच जागावाटप महायुतीचं जागावाटाप जाहीर होणार असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे म्हणालेत..