पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: नाशिकमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पेक्षाचा (Congress) नेता हा गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करतो, जनतेची दुसऱ्या राज्यात जाण्याची इच्छा नाही आहे. पण या मागे राजकीय पक्ष महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं काम करत आहे. देवी देवता महामानव यांचा अवमान करण्याचा अधिकार कोणाला नाही. काही राजकीय पक्ष म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे नव्हते. राजकीय पक्षाचे नेते प्रभू राम, प्रभू कृष्णाबद्दल अवमान होईल अशी भाषा वापरतात. राजकीय पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर (savarkar) यांच्याबद्दल बोलणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे तत्त्वज्ञान सांगत असतील तर हे नापास विद्यार्थ्याने मेरीटला कसे यायचे हे सांगण्यासारखे आहे, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. (maharashtra politicssudhir mungantiwar on opposition see what he said today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेत 1925 पासून ज्या कोणत्या राजकीय पक्षाने थोर संत नेत्याचा अपमान केला अश्या 125 जणांची यादी तयार आहे. विधानसभेत चर्चा होईल त्यावेळी मुंबईत मोर्चा काढणाऱ्यांनी उत्तर द्यावं. तत्कालीन देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये (Discovery of India) वाट चुकलेला देशभक्त असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज बद्दल केलेला आहे. वाट काँग्रेसची चुकली आहे. या महामानवाचा विचार हा रयतेच्या कल्याणाचा विचार आहे आणि तो जनतेनं स्विकारला आहे. सरस्वती मातेबद्दल बोलतात. मोर्च्यात येऊन मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतात. सगळ्यांची खुर्चीसाठी मरमर करण्याचा विचार महामानवांनी दिला नाही. 


चहा पाण्यावर बहिष्कार


हेही वाचा - Maharashtra Politics: ''सकाळी उठल्यावर जे सुरू होते त्यानं...'' चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा


आम्हाला अपेक्षा होती की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या सगळ्या प्रथा समाप्त करून नव्याने सुरुवात आपण सगळे करू, ही अपेक्षा व्यक्त केली होती. मी विरोधकांना आवाहन केलं, विनंती केली की नुसत्या खुर्चीचा विचार करू नका. कधीतरी जनतेच्या विकासासाठी प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र या. मागील पन्नास वर्षापासून तुमची सत्ता होती, तुम्ही किती काम केले हे दाखवून द्या. गरीब को सन्मान मे शिंदे फडणवीस सरकार मैदान मे, यात विरोधक आले तर तुमचाही उदोउदो करू. तुम्हाला आमच्यासोबत यायचं नाही तुम्हाला तर भाजपचा द्वेष आहे, अशी टीका मुनगंटीवारांनी केली.


बावनकुळ्यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा


देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis) मुख्यमंत्री व्हावे अशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर काही भावना व्यक्त केली असेल तर त्यांना प्रेमापोटी आपला भाव व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण देवेंद्र फडणवीस यांचं कधीही असं वक्तव्य नाही की आम्हाला विचाराचा विजय हवा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याचे माध्यम आम्ही आहोत असे म्हणतात, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यामागे ते या राज्याचा प्रतीक म्हणून त्यांनी तो भाव व्यक्त केला आहे.