पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात 24 वर्षांच्या स्वप्नील लोणकरने (Swapnil Lonkar) गळफास घेत आत्महत्या केली होती. स्वप्नीलने अथक परिश्रम घेऊन एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण केली, पण दीड वर्ष उलटूनही त्याला नोकरी मिळाली नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्यूनंतरही क्रूर थट्टा
मुलाखत रखडल्याने स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली होती. आता मृत्यूनंतरही MPSC कडून क्रूर थट्टा सुरुच आहे. MPSC ने मुलाखती यादी जाहीर केली असून या यादीत स्वप्नील लोणकरचं नाव आहे. सात जानेवारीला MPSC पास झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.  आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याचं नाव यादीत वगळावं हेही MPSC च्या लक्षात आलेलं नाही. यानिमित्ताने MPSC चा भोंगळ कारभार उघड झाला आहे.


दीड वर्षांपासून मुलाखत नाही
स्वप्नील एमपीएससीच्या 2019 च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षापासून त्याची मुलाखत झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्ये पुर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला. कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. यामुळे स्वप्निल नैराश्यात गेला. घरची बेताची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळे स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. आणि त्यातून त्याने आपलं जीवन संपण्याचा निर्णय घेतला. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिलं होतं. ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.