भोसरी : पिंपरी चिंचवडला धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनी तिच्या पोटच्या तीन मुलांना (दोन मुली, एक मुलगा) गळफास देवून स्वत: आत्महत्या केली आहे ही धक्कादायक घटना भोसरीमध्ये घडली आहे. या महिलेचे नाव फातिमा अक्रम बागवान असं (वय २८ वर्षीय) आहे. फातिमा ही मूळची कर्नाटकमधील रहिवासी आहे. हे कुटुंब चारच दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे येथून नूर मोहल्ला, न्यू प्रियदर्शनी शाळेशेजारी भोसरीमध्ये राहण्यास आले होते. हे कुटुंब तेथे भाड्याने राहत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


फातिमा हिने तिच्या पतिला म्हणजेच अक्रम बागवान याला काम शोधण्यासाठी सांगितले होते. यापुर्वी अक्रम हा फळविक्रेता म्हणून काम करीत होता. अक्रम हा सध्या कामाच्या शोधात होता. 



फातिमा हिने सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुलगी झोया अक्रम बागवान (वय ७, इयत्ता २री), अलफिया अक्रम बागवान (वय ९ इयत्ता ४थी) मुलगा जिआन अक्रम बागवान (वय ६, इयत्ता १ली) या तिघांनाही एकाच हुकला नायलॉन दोरीने लटकवून त्यांची हत्या केली. त्यानंतर तिने दुसऱ्या खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने भोसरीमध्ये खळबळ उडाली आहे. 



दुपारच्या वेळी अक्रम हा घरी आला तेव्हा त्याला दार आतून बंद असल्याचे आढळले. अक्रमने बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्यानं त्याने पोलिसांकडे गेला त्यानंतर पोलिसांच्या मदतीने दार तोडण्यात आले. त्या घरात चौघांचे मृतदेह आढळले त्यांना अशा अवस्थेत बघून अक्रमला धक्काच बसला. या महिलेने तीन मुलांना मारून स्वतः आत्महत्या का केली? याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येपूर्वी तिने कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तपास सुरू आहे. पोलीसांनी पूर्ण घरात शोध घेतला मात्र कुठल्याही प्रकारचे संशयास्पद सापडलेले नाही. याप्रकरणावर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.