मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णय
नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातले आहे. कोकणात पावसाने कहर केला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरबरदारी म्हणून प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी हा आदेश दिलाय.. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळा उद्या बंद राहणार आहेत.. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय. तसंच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेसना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलीय. रत्नागिरी जिल्ह्यात उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, कॉलेजना सुट्टी देण्यात आलीय.
पुण्यातल्या शाळांना सुट्टी... पुण्यात पावसाचा रेड अलर्ट
प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यात पुणे शहर, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी आणि भोर तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत.
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता वर नमूद तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे सकाळच्या सत्रातील खासगी, महापालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबईत मध्यरात्री 1 वाजल्यापासून सकाळी 7 या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली..काही सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आणि उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झालीय...त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय...तर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील सत्राचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, 7 जुलै रोजी झालेल्या पावसानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसंच महाविद्यालयांना दुसऱ्या दिवशी 8 जुलैला सुट्टी देण्यात आली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली. कोकणाला मुसळधार पावसानं तडाखा दिला. त्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या जिल्हाधिका-यांना हे आदेश दिले.