Maharashtra Rain: तहानलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! राज्याच्या `या` भागात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra weather updates: जुलै महिना मात्र पावसाने गाजवला. आता पावसाने दमदार कमबॅक केलं (monsoon news) आहे. त्यामुळे आता मराठवाड्यासह इतर भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसत आहे.
Maharashtra Rain Update: राज्यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी पावसाने हाहाःकार माजवला होता. यवतमाळ, धुळे, कोल्हापूर, रायगड, मुंबई या भागात मोठा पाऊस झाला. राज्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला होता. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार येत्या आठवड्यात पावसाचं पुनरागमन होणार आहे. त्यामुळे आता मराठवाड्यासह इतर भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसत आहे.
कोणत्या भागात पाऊस?
आज दिलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्टदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर वरुणराजाची कृपा होऊ शकते. तर 25 ते 31 ऑगस्टदरम्यान कोकण, विदर्भ तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
आणखी वाचा - क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?
पुढील सात दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रासहीत पश्चिम आणि दक्षिण भारतात पाऊस बरसणार आहे. मराठवाडा भागामध्ये पावसाचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे. शेतकरी हवालदील झालेले असून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही पुढील सात दिवसांमध्ये हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे पिकांचं काय होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
दरम्यान, राज्याच्या काही भागांतील पावसाची विश्रांती मात्र संपलेली दिसत नाही. मुंबई, नवी मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागातही पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळालं. विदर्भाच्या नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोल्यासह इतर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, मराठवाड्याची तहानही हा पाऊस भागवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे.