मुंबई : महाराष्ट्रात आठवड्याभरानंतर कोरोनाची रुग्णसंख्या (Maharashtra corona patients) एक आठवड्यानंतर ३० हजाराखाली आली आहे. आज राज्यात २७ हजार ९१८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर १३९ रुग्णांचा मृत्यू (Maharashtra corona death) झाला आहे. रुग्णसंख्या कमी आल्याचा दिलासा जरी असला, तरी मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात सातत्याने ३० हजारावर कोरोनाचे नवे रुग्ण आढळत होते. त्यामुळे राज्यात निर्बंधही कडक करण्यात आले, तसेच रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली. याशिवाय विविध जिल्ह्यातही प्रशासनाने नियम कठोर केले. राज्यात मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नांदेडमध्ये कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. देशातील टॉप १० कोरोनाच्या सक्रीय रुग्णांच्या जिल्ह्यांत महाराष्ट्रातले हे ८ जिल्हे आहेत. 


महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यातील आजची कोरोना अपडेट


जिल्हा नवे रुग्ण आजचे कोरोना मृत्यू
पुणे ३ हजार २२६ ३५
मुंबई (मनपा) ४ हजार ७५८ १०
नागपूर १ हजार १५६ ५४
नांदेड ९५० २०
कल्याण-डोंबिवली (मनपा) ८८८ ०३
जालना ४२४ ०४
परभणी ३७९ ०९
हिंगोली २२४ ०२
अमरावती १०८ ०२