मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा (Maharashtra corona) विस्फोट झाला आहे. आज राज्यभरात 35 हजार 952 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. आजवरचा हा सर्वाधिक नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आहे. चिंताजनक म्हणजे 111 रुग्णांचा कोरोनामुळे बळी (Maharashtra corona death) गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सध्या 2 लाख 62 हजार 685 अक्टीव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे (Maharashtra corona recovery rate) प्रमाण घसरून 87.78 टक्क्यांवर पोहोचले आहे.


महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठते. मुंबईतही आज रेकॉर्डब्रेक नव्या रुग्णांची (Mumbai corona patients) नोंद झाली आहे. मुंबईतील आजच्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 504 वर पोहोचली आहे. तर 14 जणांनी आपला जीव कोरोनामुळे गमावला आहे.


दुसरीकडे नागपूरमध्ये रुग्णसंख्येसोबतच (Nagpur Corona) मृतांचा आकडाही चिंता वाढवणारा आहे. नागपुरात आज 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात आज 3 हजार 579 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 2 हजार 285 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


महाराष्ट्रातील 9 जिल्हे हे लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडवारीनुसार देशातील टॉप 10 अक्टीव्ह कोरोना रुग्णांच्या नंबरमध्ये महाराष्ट्रातले 9 जिल्हे आहेत. यामध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे.


पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद सारख्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक होतोय. त्यामुळे आता वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोणते नवे निर्बंध लागू होतायत का, हे पाहावे लागणार आहे.