मुंबई : महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठलेला आहे. आज महाराष्ट्रात 43 हजार 183 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तब्बल 249 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दिवसेंदिवस राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणासाठी राज्य सरकार आता काय पावले उचलते, हे पाहावे लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील 8 जिल्हे हे देशातील टॉप 10 कोरोना अॅक्टीव्ह रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय होतेय. अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावण्यात येत आहेत. मात्र रुग्णसंख्या नियंत्रणात येत नाहीये. दररोज महाराष्ट्रातील नव्या रुग्णांची संख्या ही गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा जास्त म्हणजेच 30 ते 40 हजाराच्या घरात जातेय. आज तर रुग्णसंख्येने 40 हजाराचाही टप्पा ओलांडला आहे. 


कोणत्या जिल्ह्यात किती नवे रुग्ण?


जिल्हा नवे रुग्ण आजचे मृत्यू
मुंबई (मनपा) 8 हजार 646 18
पुणे 4 हजार 103 49
नागपूर 3 हजार 630 60
पिंपरी-चिंचवड (मनपा) 2 हजार 113 17
नांदेड 995 26
नवी मुंबई (मनपा) 971 04
कल्याण-डोंबिवली (मनपा) 898 03
अहमदनगर 829 04
लातूर 707 01