CORONA : राज्यात आज ६७,०१३ नव्या रुग्णांची वाढ, ५६८ जणांचा मृत्यू
राज्यात आज कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळाली.
मुंबई : राज्यात आज कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळाली. राज्यात आज कोरोनाचे 67,013 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 62,298 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासात 568 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यात आता एकूण संक्रमित व्यक्तींची संख्या 40,94,840 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 6,99,858 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 33,30,747 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 7410 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 8090 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत रिक्व्हरी रेट 84 टक्के आहे. मुंबईत अजून एकूण 83,953 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत दुप्पटीचा दर 50 दिवस आहे.
नागपुरात कोरोनामुळे भयावह स्थिती आहे. आज 110 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात आज 7344 कोरोनाबधित वाढले आहेत. तर 6314 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यात आज 1034 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 113704 वर पोहोचली आहे. आज 1204 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
लातूर जिल्ह्यात आज 1,269 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे तब्बल 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीत 24 तासात 9 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1670 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात 1650 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.