राज्यात ६७,४६८ नवीन रुग्णांचे निदान, ५६८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
मुंबईत आज ७६८४ नव्या कोरोना रूग्णांची नोंद
मुंबई : आज राज्यात ६७,४६८ नवीन रुग्णाांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५६८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४६,१४,४८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,२७,८२७ (१६.३६टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,१५,२९२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर २८,३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहे.
मुंबईत आज ७६८४ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ६७९० रूग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. मृत झालेल्या रूग्णांपैकी 40 रूग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. 33 रुग्ण पुरूष व 29 रूग्ण महिला होते. तर 3 रूग्णांचे वय 40 वर्षां खाली होते. 38 रूग्णांचे वय 60 वर्षांवर होते. उर्वरीत 21 रूग्ण 40 ते 60 वयोगटामधील होते.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. देशभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात वाढतच चालला आहे. अशावेळी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. मात्र गेल्या ५ दिवसांपासून मुंबईतील रूग्णसंख्येत घट होतेय.
नाशिकमधील (Nashik) महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात टँकमधून ऑक्सिजनची गळती (Oxygen Leakage) झाल्याने आतापर्यंत 22 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या अग्निशमन दलाकडून ही ऑक्सिजनची गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरुआहेत. राज्य सरकारकडून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.