मुंबई : राज्यात सातत्याने कोरोना रुग्णांच्या (corona cases) आकडेवारीत घट दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात  8 हजार 912 नव्या कोरोनाची रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 371 जणांना कोरोनावर मात केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर दिवसभरात 257 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Maharashtra reports 8 Thousand 912 new corona cases and 257 deaths in today 19 june 2021) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत रुग्ण किती?


राज्यासह मुंबईतही कोरोनाचा जोर ओसरला आहे. मुंबईत 24 तासांमध्ये 696 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर दिवसभरात 790 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत ताज्या आकडेवारीनुसार आता 14 हजार 751 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईचा कोरोना दुप्पटीचा दर हा 720 दिवसांवर पोहचला आहे.  



संबंधित बातम्या : 


मीरा-भाईंदरमध्ये भाजप-शिवसेनेच्या महिला पदाधिकारी भर रस्त्यात भिडल्या


अजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का...