दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एक डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार आहेत, शिक्षण विभागाची नियमावली झी २४ तासच्या हाती लागली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जाणार असून विद्यार्थींनी शाळेत असताना मास्क व्यवस्थित घालण्याबाबत नियमावलीत विशेष सूचना देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थी आणि शाळेसाठी नवीन नियम जाहीर 


 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी लागणार आहे. स्कूल बसचा वाहन चालक, मदतनीस यांचेही लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.


 बसमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी बसमधील मदतनीसाने घ्यावी. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात शाळा भरणार आहे. 3 ते 4 तासच शाळा भरणार आहे. पण मैदानी खेळ किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे
घरात कुणी आजारी असेल तर विद्यार्थ्याला घरीच थांबवावे लागणार आहे.जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. पहिले दोन आठवडे आनंददायी शिक्षणावर भर द्यावा लागणार आहे.