शाळा, महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरु, पुणे नागपूरसह ठिकठिकाणी शाळा पुन्हा गजबजणार
School, College Reopen : राज्यात आजपासून पुन्हा शाळा आणि महाविद्यालये गजबणार आहेत. (Maharashtra School and College Reopen) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यानं महाविद्यालय आणि शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
मुंबई : School, College Reopen : राज्यात आजपासून पुन्हा शाळा आणि महाविद्यालये गजबणार आहेत. (Maharashtra School and College Reopen) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज राज्यातील महाविद्यालय (College Reopen) आणि विद्यापीठे पुन्हा सुरु होत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यानं महाविद्यालय आणि शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा (School Reopen) पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज राज्यातील महाविद्यालयांबरोबर शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. मुलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. पुणे, नागपूर, गोंदिया, रत्नागिरी, औरंगाबाद सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यातही आज शाळा सुरु होणार आहेत. पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आणि पालकांच्या संमतीने शाळा सुरु करण्यात येणार आहेत.
राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संबंधित महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतने यामधील नियमित वर्ग आज 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील प्रशासनाशी चर्चा करून विद्यापीठ-महाविद्यालये सुरु करण्यात येतील. कोविड लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल, तर इतरांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल. महाविद्यालय आणि विद्यापीठातील प्रात्याक्षिक परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालय आजपासून सुरु होणार आहे. पुणे,अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालय सुरु होत आहेत. आजपासून विद्यापीठात कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार आहे.
पुण्यात आजपासून पहिली ते आठवीचे वर्ग चार तासांसाठी सुरु होतील. इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहतील. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येताना पालकांची संमती सादर करावी लागेल.
नागपूर शहरात पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु होणार आहेत. नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी शाळा सुरु करण्याला मान्यता दिली आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसणार आहे. शाळा प्रशासनाला स्वच्छता आणि सुरक्षिततेविषयी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.