महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये तीन दिवस शाळांना सुट्टी? शिक्षण विभागाचे निर्देश
Maharashtra Assembly Election: मतदानामुळे राज्यातील शाळांना 18, 19, 20 रोजी सुट्टी जाहीर. शाळा मध्ये मतदान केंद्र असतात त्यामुळं ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Election: राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांनी तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. त्यामुळं 18,19 आणि 20 नोव्हेंबर असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्यात येणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने आयुक्तांना दिले आहेत.
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यानंतर लगेचच 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदानसाठी शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. तसंच, शिक्षकांचाही निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत मोठा सहभाग असतो. मतदानाची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेते. त्या पार्श्वभूमीवर 18,19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत शाळा भरवणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या अखत्यारित शाळा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आयुक्त स्तरावरुन आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
स्कूल बस दोन दिवस इलेक्शन ड्युटीवर
राज्य परिवहन (आरटीओ) विभागाच्या सूचनेनुसार विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी १९ आणि २० नोव्हेंबरला स्कूल बसची आवश्यकता असल्याने या दोन दिवशी या बस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी न चालविण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र घेतला आहे. मतदानामुळे शाळांना २० तारखेला सुट्टी आहे. मात्र, १९ तारखेला बसअभावी विद्यार्थ्यांना पायपीट करत, अथवा सार्वजनिक बस, रिक्षा, टॅक्सीने शाळेत ये-जा करावी लागणार आहे. या बस १८ नोव्हेंबरलाच रात्रीपासून आरटीओच्या ताब्यात देण्यात येणार आल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी १९ नोव्हेंबरला उपलब्ध करून देणे कठीण असल्याने हा निर्णय घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.
मोबाईल नेटवर्क नसलेल्या मतदान केंद्रावर निरोप्याची नियुक्ती
पुणे जिल्ह्यातील 38 मतदान केंद्रावर 76 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नसलेल्या मतदान केंद्रावरची माहिती मिळवण्यासाठी कर्मचारी निरोप घेऊन नेटवर्क असणाऱ्या विचारांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तीन मतदान केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून भोर वेल्हा मुळशी तालुक्यात सर्वाधिक असे गावे आहेत.
एक कर्मचारी मतदान केंद्रावर नेमला जाईल दुसरा कर्मचारी नेटवर्क असलेल्या ठिकाणी नेमला जाईल. मतदान केंद्रावरील कर्मचारी काही माहिती असेल तर तो नेटवर्क असलेल्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांना सांगणार.