मुंबई : Eknath Shinde government cabinet expansion : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत. आज 18 आमदार शपथ घेणार आहेत.  शिंदे - फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा राजभवनात सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा होत आहे. तुमचा मंत्री कोण? याची माहिती जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- चंद्रकांत पाटील
पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून भाजपचे आमदार
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचा 'मराठा' चेहरा
2014 - युती सरकारमध्ये महसूल, सार्वजनिक बांधकाममंत्री 
पांडुरंग फुंडकरांच्या निधनानंतर कृषी खात्याचा अतिरिक्त भार
2019 पासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष


- सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार
2010 ते 2013 सालापर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष
2014 - युती सरकारमध्ये अर्थमंत्री आणि वनमंत्री
मुनगंटीवारांच्या प्रयत्नानं चंद्रपुरात दारुबंदीचा ऐतिहासिक निर्णय


- राधाकृष्ण विखे पाटील
1995 पासून नगरमधील शिर्डी विधानसभेचे आमदार
सहकार, समाजकारण आणि राजकारणील मातब्बर नेतृत्व
काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा राजकीय प्रवास
माजी शिक्षणमंत्री, माजी कृषिमंत्री
2014 - विधानसभा विरोधी पक्षनेते असताना काँग्रेसमधून भाजपात



- संजय कुटे
बुलढाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे चार टर्म आमदार
2014 - युती सरकारमध्ये कामगार कल्याणमंत्री
भाजपमधील तरुण, ओबीसी चेहरा
देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी
महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यात मोठी जबाबदारी


- गिरीश महाजन
जळगावमधील जामनेर मतदारसंघाचे आमदार
उत्तर महाराष्ट्रातला भाजपचा महत्त्वाचा चेहरा
2014 - युती सरकारमध्ये जलसंपदामंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री
2019 - सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी
देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख


- रवींद्र चव्हाण
2009 पासून डोंबिवली मतदारसंघाचे भाजप आमदार
2016 - युती सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक
महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यात महत्त्वाची भूमिका


- मंगलप्रभात लोढा 
भाजप आमदार मंगल प्रभात लोढा मलबार हिल मतदारसंघातून विजयी
लोढा हे रिअल इस्टेटमधील मोठं नाव
सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक
मूळचे राजस्थानच्या जोधपूरचे असलेले लोढा १९८१ मध्ये मुंबईत आले. 
लोढा समूहाची स्थापना. रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा दबदबा 


- अतुल मोरेश्वर सावे
अतुल  सावे हे  औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी
2014 ते 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात 2018 मध्ये त्यांना राज्यमंत्रिपद (उद्योग आणि खनिकर्म अल्पसंख्यांक विकास व वक्फ, महाराष्ट्र राज्य)
तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद 


- विजयकुमार गावित 
नंदुरबारमधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.  


- उदय सामंत
रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार
2004 पासून आतापर्यंत चारवेळा आमदारपदी निवड
2014 - राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश
2018 - शिवसेना उपनेतेपदी निवड, म्हाडाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक
2019 - मविआ सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री


- गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार
पानटपरीवाला ते मंत्रीपदापर्यंत प्रवास
1999 मध्ये पहिल्यांदा विधानसभा आमदार
2009 मध्ये शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती
2016-19 - युती सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री
2019 - मविआ सरकारमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री
शेरोशायरी आणि जोशपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध


- दीपक केसरकर
सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार
2009 पासून आमदारकीची तिसरी टर्म
2014- युती सरकारमध्ये गृह आणि वित्त राज्यमंत्री
2019 - मविआत मंत्रीपद न मिळाल्यानं नाराजी
सध्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते


- अब्दुल सत्तार 
संभाजीनगरमधील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार
2009 पासून आतापर्यंत तीनवेळा आमदार
2009 - काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये पशूसंवर्धन राज्यमंत्री
2019 - काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश
2019 - मविआ सरकारमध्ये महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री


- दादाजी भुसे
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (बाह्य) मतदारसंघाचे आमदार
सामान्य शेतक-याचा मुलगा ते मंत्री असा प्रवास
2004 पासून आतापर्यंत चारवेळा आमदार
2014 - युती सरकारमध्ये सहकार, ग्रामविकास राज्यमंत्री
2019 - मविआ सरकारमध्ये कृषीमंत्री


- तानाजी सावंत
धाराशिवमधील भूम परांडा मतदारसंघाचे आमदार
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड
खासगी साखरसम्राट, शिक्षणसम्राट अशी ओळख
2015 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश
2016 - शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती
जून 2019 - जलसंधारणमंत्री


- शंभूराज देसाई
सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार
2004 पासून आतापर्यंत तीनवेळा आमदार
2019 - मविआ सरकारमध्ये गृह (ग्रामीण) आणि अर्थ राज्यमंत्री
21व्या वर्षीच बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची धुरा सांभाळली
1995-99 काळात युती सरकारमध्ये सहकार परिषदेचे अध्यक्ष
महाराष्ट्र बँकेचे माजी संचालक


- संदीपान भुमरे
संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचे आमदार
आतापर्यंत 5 वेळा विधानसभेवर आमदार
साखर कारखान्यात 'स्लिप बॉय' ते मंत्रीपदापर्यंत 


- संजय शिरसाठ 
संभाजीनगर पश्चिमचे शिवसेना आमदार 
रिक्षाचालक ते तीन वेळा आमदारकीचा प्रवास 
भारतीय कामगार सेनेतून राजकारणाला सुरूवात 
2000 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवड
2005 मध्ये पुन्हा नगरसेवक आणि सभागृहनेते 
2009 पासून सलग तीन वेळा विजयी