जळगाव : राज्यात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंता व्यक्त केली आहे. आज जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादा राजकारणी टोकाची भूमिका घेऊन जात असेल त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन द्यावं ही भूमिका घेतली तर ती काळजी करण्यासारखं आहे. या सगळ्या कार्यक्रमामुळे समाजात सामाजिक ऐक्य संकटात येईल की काय याची चिंता वाटते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 


काही झालं तरी महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, सर्व धर्म जाती भाषा यांच्यात सामंज्यस असलं पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे .


राज ठाकरे यांचं भाषण ऐकल्यानंतर असं वाटतंय की त्यांना त्या रस्त्याने जायचा कार्यक्रम दिसतोय, प्रत्येक राजकीय पक्ष आपला कार्यक्रम आपली दिशा ठरवतं. त्यांना अधिकार आहे त्यांनी ठरवलं असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.