Crime News : सांगलीतल्या मिरजेत (Miraj) एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. मिरज तालुक्यातील बेडग इथं 31 वर्षांच्या एका मुलाने आपल्या 55 वर्षांच्या वडिलांचा निर्घृण खून केला (Son Killed Father). याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वडिलांची हत्या केल्यानंतर मुलगा फरार झाला होता. मिरज ग्रामीण पोलिसांनी (Miraj Rural Police) अवघ्या 24 तासात आरोपी मुलाला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का केली वडिलांची हत्या?
बेडग गावात दादू आकळे हे आपला मुलगा लक्ष्ण आकळेसह राहातात. लक्ष्मणने आपले वडिल दादू आकळे यांच्याकडून 80 हजार रुपये परत देण्याच्या बोलीवर घेतले होते. या पैश्याच्या मागणीवरून मुलगा लक्ष्मण आणि वडील दादू यांच्यात वाद सुरू होता. आज सकाळी पुन्हा वडील दादू आकळे हे मुलगा लक्ष्मण याच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले. यावेळी मुलगा लक्ष्मणने जमीन आपल्या नावावर करुन देण्यास सांगतिलं. यावरुन वडिल दादू आकळे आणि मुलाग लक्ष्मण यांच्यात वाद झाला. वाद इतका वाढला की रागाच्या भरात लक्ष्मणने वडिल दादू आकळे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. 


ट्रॅक्टरखाली चिरडून दादू आकळे यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर लक्ष्ण आकळे ट्र्र्र्रॅक्टर घेऊन पसार झाला. काही वेळाने छोटा मुलाग अर्जुन तिथे आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. अर्जुनने या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपी मुलाला अटक केली आहे.  याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. पण केवळ संपत्तीसाठी जन्मदात्या बापाची हत्या केल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


समृद्धीवर भीषण अपघात
गाडीचे नियंत्रण सुटल्याने समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) झालेल्या भीषण अपघात (Accident) एकाच कुटुंबातील 4 भावांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हे सगळे दोन दिवसांपूर्वी तेलंगाना इथं काकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रम आटोपून सुरतकडे परतत होते. मात्र वाहन चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकच उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे तीन वाजता करमाड- शेकटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर घडलीय. सर्व जण सूरचे रहिवासी आहेत.