शिर्डी : राज्यात 10 वी (Ssc Exam Result 2022) आणि 12 वीची परीक्षा (Hsc Exam Result 2022) दिलेल्या विद्यार्थ्यांचं लक्ष आता निकालाकडे लागून राहिलं आहे. निकालाचे दिवस जसजसे जवळ येतायेत, तसंतसं विद्यार्थ्यांची धाकधूक वाढतेय. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 10 वी आणि 12 वीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. (maharashtra ssc and hsc result 2022 school education minister varsha gaikwad gived hint about 10th and 12th state board result date at shirdi)


शिक्षणमंत्री काय म्हणाल्या? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात तर 15 दिवसांनी म्हणजेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागेल", अशी माहिती वर्षा गायकवाडांनी दिली. त्या शिर्डीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.


यंदा कोरोनानंतर 2 वर्षांनी पहिल्यांदाच दहावी-बारीवीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पार पडली. तर 12 वीच्या लेखी परीक्षेचं आयोजन हे 4 मार्च ते 30 मार्च या काळात  करण्यात आलं होतं.