Maharashtra SSC Result 2023 Today: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्याच आलेल्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. इयत्ता बारावी म्हणजेच HSC बोर्डाचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला ज्यानंतर आता विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालांची उत्सुकता लागून राहिली आहे. शिक्षण मंडळाकडून अद्यापही निकालाची अधिकृत तारीख घोषित करण्यात आलेली नाही. पण, सध्या मात्र निकाल काही दिवसांतच लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आयत्या वेळी गोंधळ नको, म्हणून निकालासाठीची तयारी केलेली बरी. बारावीच्या निकालांप्रमाणे दहावीचे निकालही सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने जाहीर होतील. त्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात येईल जिथं राज्यातील निकालांची विभागनिहाय आकडेवारी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा एकूण आकडा आणि इतर माहिती देण्यात येईल. 


कुठे पाहाल निकाल? 


दहावीच्या शालान्त परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. निकालासाठी mahresult.nic.in या संकेतस्थळालाही भेट देऊन सर्व विषयातील मार्क पाहता येतील. साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला इयत्ता दहावीचा निकाल लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. 6 जून ही निकालाची संभाव्य तारीख सांगण्यात येत आहे. 


हेसुद्धा वाचा : Video : बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं 


निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळांवर विचारलेल्या माहितीची पूर्तता करावी लागणार आहे. जिथं हॉलतिकीट क्रमांक, आईचं नाव अशी माहिती विचारली जाऊ शकते. दरम्यान, सध्याच्या घडीला दहावीचे निकाल लागण्याआधीच इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरु झाला आहे याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी. 


जीवनातील नव्या टप्प्यासाठी विद्यार्थी सज्ज... 


दहा ते बारा वर्षांचं शालेय आयुष्य पूर्ण करून दहावीच्या परीक्षा दिलेले सर्वच विद्यार्थी जीवनातील एका नव्या टप्प्यासाठी सज्ज होत आहेत. शालेय जीवनातून बाहेर पडत महाविद्यालयीन आयुष्याची सुरुवात करण्यासोबतच Career च्या वाटेवरील हा पहिला टप्पा सर करण्याची उत्सुकता अनेकांच्या पोटात गोळा आणत आहे. फक्त विद्यार्थीच नव्हे, तर पालकांनाही निकालाची टक्केवारी, मनाजोग्या शाखेत आणि मनाजोग्या महाविद्यालयात प्रवेश याबाबतची चिंता लागून राहिली आहे. तेव्हा दहावीच्या निकालांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या निकालासाठी All The Best!!!