Maharashtra SSC 10th Result 2023 Today: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं अत्यंत महत्त्वाची माहिती देत दहावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. गुरुवारी म्हणजेच 2 जून 2023 रोजी दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये 8,44,116 मुलं आणि 7,33,067 मुलींचा समावेश आहे. तेव्हा या सर्वच विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक आणि शिक्षकांनाही निकालाबाबत उत्सुकता आहे. 


सहसा दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. पण, यंदाच्या वर्षी मात्र बारावीच्या मागोमाग दहावीचेही निकाल लागलीच जाहीर केले जाणार आहेत. 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेचे निकाल लागल्यानंतर आता लाखो विद्यार्थी त्यांच्या शालेय आयुष्याच्या विश्वाहून बाहेर पडून महाविद्यालयीन जीवनाची नवी सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी निकाल नेमका कसा आणि कुठे पाहाल हे जाणून घ्या... 


  • दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

  • त्यानंतर होमपेजवर असणाऱ्या  Maharashtra SSC result च्या लिंकवर क्लिक करावं. 

  •  तिथं तुमचा हॉलतिकीट क्रमांक टाका. आवश्यक तपशील विचारल्यास त्याचीही माहिती द्या. 

  •  पुढच्या क्षणालाच तुमच्यासमोर निकाल Open झालेला असेल. 

  • पुढे निकालातील सर्व माहिती, गुण वगैरे तपासून पाहा आणि ही माहिती डाऊनलोड करा. गरज वाटल्यास तुम्ही या माहितीची प्रिंटही काढू शकता. 



निकाल पाहण्यासाठीच्या लिंक खालीलप्रमाणे