मुंबई : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली एकतर्फी वेतनवाढ नाकारत राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता संपाचं हत्यार उपसलं पण परिवहनमंत्री आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेली बैठक यशस्वी झाली असून हा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज विविध एसटी कर्मचारी संघटनांसमवेत चर्चा केली. एसटी कर्मचार्यांनी अचानक सुरू केलेला संप मागे घेऊन कर्मचार्यांना कामावर हजर होण्यास सांगावे, असे आवाहन त्यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांना केले.एसटी कर्मचाऱ्यांनी स्वयंघोषित संप केला होता, तो त्यांनी मागे घ्यायची घोषणा केली.


रावते म्हणाले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचाऱ्यांचा फायदा होईल असा निर्णय घेतला जाईल.उद्धव ठाकरेंनी दुपारी यात लक्ष घातले. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनानं संप मिटवला असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह, मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, इंटकचे मुकेश तिगोटे, कास्ट्राईब संघटनेचे श्री. निरभवणे, इंटकचे श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.


प्रवाशांचे हाल 


राज्यातील एसटी बससेवा 80 टक्के ठप्प झाली होती. राज्यातील विविध भागांमध्ये संपाचा परिणाम जाणवत आहे. नाशिकमधील ठक्‍कर्स बझार, महामार्ग, जुने सीबीएस बसस्थानकात बसेस जागेवरच उभ्या असल्यानं संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.  तर नागपूर विभागात आज 90 टक्के बस फेऱ्या बंद होत्या. ज्या मोजक्या बस फेऱ्या सुरू आहेत त्यात प्रवाशांची गर्दी होती. सांगली जिल्ह्यात 95 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले.