SSC-HSC : दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेला (Board Exam) सामोरे जायला आता अवघे काही महिनेच उरले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परिक्षेची तयारी करायला सुरुवात केली आहे. मात्र या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी कसून अभ्यास करावा लागणार आहे. कारण यंदाच्या वर्षी बोर्डाने परिक्षेसाठी कठोर नियमावली आखली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहावी(SSC) आणि बारावी (HSC) बोर्डाची परिक्षा (Board Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना काळात अनेक सवलीत देण्यात आल्या होत्या. बोर्डाच्या परिक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या होत्या. तसेच कोरोनामुळे विद्यार्थ्यांची लिहायची सवय मोडल्याने त्यांना परीक्षेसाठी अतिरिक्त वेळही देण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा नायनाट झाल्याने सर्व सुरळीत झाले आहे. त्यामुळे आता बोर्डाने देखील विद्यार्थ्यांसाठी कठोर नियमावली ठेवली आहे. ही नियमावली (Exam Guidelines) कशी असणार आहे, हे जाणून घेऊय़ात. 


'हे' कठोर नियम असणार


दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या वर्षी होणाऱ्या बोर्डाच्या परिक्षांना (Exam Guidelines) कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना काळात तसेच मागच्या वर्षी देण्यात आलेल्या सर्व सवलती यंदा रद्द करण्यात आल्यात. 


पेपरच्या किमान अर्धा तास आधी विद्यार्थ्याना आपल्या परीक्षा कक्षामध्ये हजर राहायचं आहे.पहिल्या सत्रातील पेपरसाठी सकाळी साडे दहा नंतर आणि दुपारच्या सत्रातील पेपरसाठी अडीच वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात सोडण्यात येणार नाही. त्यासोबतच शाळा तिथे परीक्षा केंद्र, अभ्यासक्रम कपात, वाढीव वेळ या सुविधाही रद्द करण्यात आल्या आहेत. शाळा तिथे परीक्षा केंद्र न ठेवता आता जवळच्या शाळेतल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल.


दरम्यान दहावीची (SSC) लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर 12 वीची (HSC) लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.हे संभाव्य वेळापत्रक असून निश्चित वेळापत्रकाबाबतची माहिती शाळांना दिली जाणार आहे. त्या सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत