नागपूर : राज्य सरकार आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकार अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी दोन हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. यासाठी आज विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये 159 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलीय. तीन वर्षांच्या कार्यकाळात राज्यातल्या भाजपा-शिवसेना युती सरकारने विक्रमी पुरवणी मागण्या मांडल्या आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत या सरकारने 12 अधिवेशनात मिळून 1 लाख 56 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. आज विधानसभेत अर्थमंत्र्यांनी 11 हजार 445 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. जुलै 2017 च्या पावसाळी अधिवेशनात सरकारने सर्वाधिक 33 हजार 533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. 



आज सादर केलेल्या 11 हजार 445 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये दोन हेलिकॉप्टर खरेदीसाठी 159 कोटी 63 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. तर पावसाळी अधिवेशन नागपूरला होत असल्याने आयोजनासाठी 1 कोटी 14 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निवृत्त पत्रकारांच्या पेन्शनसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद आहे.