मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन पुकारलंय. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा संप अघोषीत संप आहे. कर्मचा-यांच्या कोणत्याही संघटनेने संपाची हाक दिलेली नाहीये. राज्यातील अनेक ठिकाणी संपाचा परीणाम जाणवतोय. राज्यातील अनेक ठिकाणी एसटी सेवा विस्कळीत झाल्याचं चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत कुर्ला आणि परळ स्थानकातून गाड्या निघाल्या नाहीत. तर मुंबई सेंट्रल आणि पनवेलमधून गाड्या निघाल्या आहेत. उरणमधूनही गाड्या निघाल्या नाहीत.



वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचं संपाचं हत्यार उपासलं आहे. या संपामुळे राज्यातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे गावावरुन परतणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.


 


सांगली जिल्ह्यात एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. सोलापुरातील बार्शी इथंही सर्व कर्मचारी संपावर आहेत. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, करमाळा इथंही काही प्रमाणात एसटी बंद आहेत. रायगड जिल्ह्यात संपाला संमिश्र प्रतिसाद आहे. कर्जत, माणगाव आगार वगळता अन्य आगारातून अल्प प्रमाणात बस सेवा सुरू आहेत या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होतेय.