पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळविणाऱ्या शिक्षकांचा आता शोध सुरू झाला आहे. बोगस मास्तरांचा यामुळे पर्दाफाश होणार आहे. कालपर्यंत राज्यातील सहा हजार शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडे जमा झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण पडताळणीनंतरच दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची गुणपत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. 


त्यामुळे या कालावधीत नोकरी मिळविलेल्या बनावट शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार असणार आहे. 



शिक्षण परिषदेने याबाबत जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश दिले आहेत. 


परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना दिली आहे. शिक्षकांना परीक्षा परिषदेकडे टीईटीचे मुळ प्रमाणपत्र पाठविणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा पगार मिळणार नाही.  जे शिक्षक आपले मूळ प्रमाणपत्र पाठविणार नाही, त्यांचा पगार थांबविण्यात येणार आहे.