Maharashtra Tet Result : राज्यात 96 टक्के मास्तर नापास
राज्याच्या टीईटी परीक्षेचा निकाल धक्कादायक लागलाय. 96% मास्तर या परीक्षेत नापास झालेत.
पुणे : शिक्षक (Teacher) बनवण्यासाठी तुम्हाला टीईटी परीक्षा (Tet Exam) द्यावी लागते. पण राज्याच्या टीईटी परीक्षेचा निकाल धक्कादायक लागलाय. 96% मास्तर या परीक्षेत नापास झालेत. पाहुयात एक रिपोर्ट. राज्यात 96 टक्के मास्तर नापास झालेत. तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल टीईटी परीक्षा देणं बंधनकारक असतं. याच शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल अवघा साडेतीन टक्के लागला. राज्याचा टीईटीचा निकाल कशापद्धतीनं घसरलाय बघुयात. (maharashtra tet teacher eligibility test result decresed see full report)
TETचा निकाल घसरला
पेपर एक (पहिली ते पाचवी गट)
परीक्षार्थी-----2 लाख16 हजार 579
उत्तीर्ण---9653
निकालाची टक्केवारी----3.79%
पेपर एक (सहावी ते आठवी गट) -
परीक्षार्थी----1 लाख 85 हजार 439
उत्तीर्ण---7634
निकालाची टक्केवारी---3.56%
शिक्षक पदासाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असते. लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. पण राज्यात यंदा या परीक्षेचा निकाल घसरलाय, अवघे साडेतीनटक्के विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेत. काही वर्षांपूर्वी राज्यात टीईटी घोटाळा उघडकीस आला होता, त्यानंतर लागलेला हा निकाल धक्कादायक म्हणावा लागेल.