Thane Hit And Run Case: हिट अँड रन प्रकरणामुळं ठाणे पुन्हा एकदा हादरले आहे. 21 ऑक्टोबर रोजी रात्री एका मर्सिडीज कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन हेगडे असं मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 21 वर्षांचा दर्शन हेगडे सोमवारी रात्री खाण्याचे सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. सामान घेऊन घरी परतत असतानाच नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या मर्सिडीजने धडक दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर्शनला मर्सिडिजने चिरडल्यानंतर तो चालक घटनास्थळावरुन पसार झाला. मात्र, दर्शनचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार जप्त केली आहे. तर, या प्रकरणात अधिक चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानापासून काहीच अंतरावर हा अपघात घडला आहे. जिथे अपघात घडला तेथील CCTV कॅमेरे बंद पडले होते. एका भरधाव मर्सिडीज गाडीने एका २१ वर्षीय निष्पाप मुलाला चिरडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


एक महिन्यापूर्वी मुंबईमध्येही हिट अँड रनची घटना समोर आली होती. दहिसर परिसरात एका भरधाव गाडीने बाईकस्वाराला चिरडले होते. ज्यात एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. करण राजपूत त्याचा मित्र आदित्यसोबत दहिसरहून कांदिवलीला जात होता. त्याचवेळी पुलाच्या खालून जात असताना करण राजपूतने बाईकला टक्कर दिली. त्यात करण आणि आदित्य दोघही गंभीर जखमी झाले होते. 


तरुणाचा मृत्यू


अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावरील अशोक वाटिकेजवळ एका दुचाकीला अपघात होऊन यात २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. उड्डाणपुलावरून एक युवक दुचाकीने जात असताना समोरुन येणाऱ्या एका वाहनाने या दुचाकीला जोरदार धडक दिली यात दुचाकी चालक युवक गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं