आज राज्यात ५८९२४ नवे कोरोना रूग्ण तर ३५१ जणांचा मृत्यू
सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद
मुंबई : आज राज्यात ५८,९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज ३५१ करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५६% एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे. म्हणजे लॉकडाऊनमुळे कोरोनाचा आकडा कमी होत आहे का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४०,७५,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,९८,२६२ (१६.१९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,४३,९६८ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर २७,०८१ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.
मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी समोर येतेय. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. क्वारंटाईन असलेल्यांची संख्या देखील वाढतेय. पण तुलनेत लसीकरणाचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय. मुंबईत लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यात आलीय. या केंद्रावर लोकांच्या रांगा देखील पाहायला मिळतायत. पण याठिकाणी लसटंचाई जाणवू लागलीय. लसीकरणाच्या वेगावर याचा परिणाम होतोय. रविवारी तब्बल ३५ खासगी केंद्रांनी लस साठय़ाअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली. त्यामुळे दिवसभरात अर्ध्या संख्येने म्हणजेच 27 हजार 189 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
देशात काही दिवसापासून कोरोनाने हाहाकार मांडला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटे पेक्षा अधिक भयानक आणि वेगाने पसरणारी आहे. त्यामुळे या रुग्णवाढीला रोखण्यासाठी भारत सरकारने 18 वर्षांवरील सर्व लोकांना १ मे पासून कोरोना लस देण्यास सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे. आज म्हणजेच सोमवारी संध्याकाळी आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.