Corona | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढऊतार कायम, `या` जिल्ह्याचा आकडा वाढताच
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार कायम आहेत.
मुंबई : राज्यातील गेल्या 24 तासांमधील कोरोना आकडेवारी समोर आली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार कायम आहेत. दिवसभरात राज्यात एकूण 9 हजार 844 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 9 हजार 371 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात एकूण कोरोनामुळे 197 जणांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra today June 24 2021 9844 corona patients have been registered)
राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख 62 हजार 661 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) 95.93 % इतका झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा 2 टक्के इतका झाला आहे.
राज्यात ताज्या आकडेवारीनुसार एकूण 1 लाख 21 हजार 767 सक्रीय रुग्ण आहेत. या रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. 6 लाख 32 हजार 453 जण हे होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 166 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
राज्यात काही दिवसांपूर्वी निर्बंध शिथिल करण्यात आले. इ पासची अट रद्द करण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊमुळे अनेकांना घरात रहावं लागलं. निर्बंध शिथिल होताच अनेकांनी मुंबईनजीक असलेल्या अलिबाग, मुरुड यासारख्या पर्यटन स्थळी धाव घेतली. या ठिकाणी कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे.
रायगड जिल्ह्यात मुंबईनंतर सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. रायगडमध्ये गेल्या 24 तासात एकूण 609 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये ठिकठिकाणी पोलिस तपासणी सुरु आहे. विनाकारण तसेच मुंबईतून पर्यंटनासाठी आलेल्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत आहे. तसेच अँटीजेन टेस्टही करण्यात येत आहे.
मुंबईत किती रुग्ण?
राज्याप्रमाणे मुंबईतही रुग्णसंख्येत कोरोना रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. मुंबईत 24 तासात एकूण 789 रुग्णांचं निदान झालं आहे. तर 542 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका
दरम्यान राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना मोठा धोका आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्क तसेच तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना केली आहे.
संबंधित बातम्या :
अखेर भीती खरी ठरली, आता या ठिकाणी 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन