Nashik News : नाशिकच्या देवळाली कँम्पमध्ये दोन अग्नीवीरांचा मृत्यू झालाय. तोफेचा गोळा (Cannonball Exploded) लोड केल्यानंतर त्याचा जागीच स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडलीये. यात 20 वर्षीय गोविंद सिंग आणि 21 वर्षीय सैफत शित या अग्नीवीरांचा उपचारादरम्यान मृत्यू (Agniveers Death) झालाय.. नाशिकच्या देवळाली कॅम्प (Devlali Camp) परिसरातील अग्नीवीरांची टीम फायर करत असताना ही दुर्घटना घटना घडली. याप्रकरणी नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय घडलं नेमकं?
तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात आर्टिलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक अग्निवीर गंभीर जखमी झाला आहे. याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास इंडियन फील्ड गनद्वारे  फायर रेंज आर्टिलरी इथं अग्निवीरांचा सराव सुरू होता. 


या सरावादरम्यान तोफा लावून त्यावर प्रत्येकी सात अग्निवीर गोळा फेकून आपले लक्ष्य भेदत होते. त्याच सुमारास तोफ नंबर 4 च्या तोंडी गोळा टाकला आणि तो गोळा फायर केल्यानंतर लक्ष्य केलेल्या ठिकाणी न जाता तोफेपासून काही अंतरावर तो गोळा खाली पडला आणि त्याचा जागीच स्फोट झाला. या स्फोटात गोहिल विश्वराज सिंग (वय 20, मूळ रा. गुजरात, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड), सैफत शीत (वय 21, मूळ रा. पश्चिम बंगाल, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अप्पा स्वामी (वय 20) हा जखमी झाला असून, या अग्निवीरावर सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत...