सोलापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होत आहेत. तर दुसरीकडे सोलापुरातील 5 तालुक्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहेत. याच संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार अत्यावश्यक सेवा संध्याकाळी 4 पर्यंत सुरू राहणार, बिगर अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. 


मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रम पूर्ण पणे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. 


खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहणार आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होत असताना सोलापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत.