Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपच्या वतीनं उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीमध्ये पक्षाच्या वतीनं 99 उमेदवारांना संधी देण्यात आली असून यामध्ये प्राधान्य प्रस्थापितांनाच मिळाल्याचं पाहायला मिळालं. इतर राज्यांमध्ये भाजपनं नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनिती आखली होती, पण महाराष्ट्रात किमान पहिल्या यादीच तरी त्यांच्या या रणनितीचा फारसा प्रभाव दिसला नाही. थोडक्यात पक्षानं जुन्या शिलेदारांवर विश्वास टाकला. असं असलं तरीही पक्षाच्या 20 विद्यमान आमदारांना मात्र यादीत संधी देण्यात आली नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षानं पहिल्या यादीत संधी दिली नसल्यामुळे आता BJP चे हेच 20 आमदार गॅसवर असल्याचं म्हटलं जात आहे. आता या 20 जणांपैकी किती जणांना नारळ मिळणार? पक्ष कोणत्या जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


आमदार वेटिंगवरच... 


भाजपची पहिली यादी जाहीर झाली असली तरीही या यादीत नाशिक मध्य, उल्हासनगर, बोरिवली, वर्सोवा, घटकोपर पूर्व, पेण, पुणे छावणी, गेवराई, माळशिरस, अकोट, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, कारंजा, वाशिम, आर्वी, नागपूर मध्य, गडचिरोली, आर्णी या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी मिळाली नसल्यानं आता त्यांची चिंता वाढली आहे.


भाजपने पहिल्या यादीत बहुतांश ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी दिली तर, काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली. पण, जवळपास 20 आमदारांना मात्र संधी दिली नसल्यामुळं आता या नेतेमंडळींची चिंता वाढली आहे. 


हेसुद्धा वाचा : Jammu Kashmir : सत्तास्थापना होताच का झाला Terrorist Attck? मोठा शस्त्रसाठा नेणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान 


दरम्यान, भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील एकाही मतदारसंघातील उमेदवाराचा समावेश नसल्याने विद्यमान आमदारांसह इच्छुक उमेदवारांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. 2019 च्या निवडणुकीत वाशिम मतदारसंघातून भाजपचे लखन मलिक, तर कारंजा मतदारसंघातून भाजपचे स्व.राजेंद्र पाटणी यांनी विजय मिळविला होता. त्यामुळे महायुतीत या दोन्ही मतदारसंघांवर भाजपने प्रबळ दावा केल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय रिसोड मतदारसंघातही मागील दोन वर्षां पासून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार अनंतराव देशमुख यांना पक्षात घेऊन कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या.