प्रेमाने मागितलं असतं तर... औक्षण दूरच पण, भाऊबिजेच्याच दिवशी सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका
Maharashtra Vidhan Sabha Election : प्रेमाने मागितलं असतं, तर सगळं दिलं असतं, मात्र...; भाऊबीजेला अजित पवारांचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची सडकून टीका
Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या धुमश्चक्रीमध्ये सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदारांची मनं जिंकण्यासाठी नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू असतानाच, राजकीय समीकरणांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम थेट नेतेमंडळींच्या नातेसंबंधांवरही होताना दिसत आहे. पवार कुटुंबाची यंदाची दिवाळी हे त्याचच एक उदाहरण.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबाकडून साजरा होणारा दिवाळी पाडवा कायमच चर्चेचा विषय राहिलेला असताना यंदा मात्र दोन मांडवांमध्ये हा सोहळा साजरा झाला, तोही वेगळा. भाऊबीजसुद्धा याला अपवाद नव्हती. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भाऊबीजेटच्या फोटोंची सर्वांनाच प्रतीक्षा असताना समोर आली ती ए अशी बातमी, जिथं सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केल्याचं पाहायला मिळालं.
हेसुद्धा वाचा : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर
'प्रेमाने मागितलं असता तर सगळं दिलं असत, मात्र हिसकावून घेणाऱ्यांना काहीच देणार नाही', असं म्हणत सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली. कोल्हापूरच्या शिरोळ मतदार संघात मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांवर त्यांनी सडकून टीका केली. आर आर आबांना ते विसरले असतील, आम्ही विसरणार नाही असं म्हणत अजित पवारांनी भूतकाळात केलेल्या वक्तव्यांवर त्यांनी नाराजीचा सूर आळवला.
यंदाच्या वर्षी राजकारणाच्या वर्तुळामध्ये पवार कुटुंबाचीच चर्चा झाली. इथं अजित पवारांनी काटेवाडीत दिवाळी पाडवा साजरा केला, तर तिथं शरद पवार यांचा दिवाळी पाडवा गोविंद बागेत साजरा झाला, जिथं त्यांनी लेक सुप्रिया सुळे यांच्यासह उपस्थितांच्या अभिवादन आणि शुभेच्छांचा स्वीकार केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे 'वेगळेपण' सर्वांचं लक्ष वेधणारं ठरलं.