Maharashtra Breaking News LIVE Update : सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर

Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.   

Maharashtra Breaking News LIVE Update : सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर

Maharashtra Breaking News LIVE Update : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. विधानसभा लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार. महायुती आणि मविआतील बंडखोर अर्ज मागे घेणार का, याकडे लक्ष.  जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर. 

4 Nov 2024, 21:41 वाजता

सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर 

सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर झाले. कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेस उमेदवाराने अचानक उमेदवारी मागे घेतल्याने सतेज पाटील यांची नामुष्की झाली. मधुरिमा राजे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर कार्यकर्त्यांचा गराडा पाहायला मिळाला.

4 Nov 2024, 20:56 वाजता

राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 20 नोव्हेंबर रोजी होतेय.नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अंतिमतः राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या एकूण 7 हजार 78 उमेदवारांपैकी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत  2 हजार 938 उमेदवारांनी माघार घेतली आहे.

4 Nov 2024, 20:28 वाजता

उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभांना उद्यापासून सुरुवात

कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे प्रचार सभांना सुरुवात करणार आहेत.दुपारी 12 वाजता कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी अंबाबाई देवीचा दर्शन घेतील. दुपारी साडे बारा वाजता दर्शन झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता राधानगरी विधानसभा आदमापुर येथे सभा होईल, कोल्हापूर नंतर रत्नागिरीकडे सभेसाठी जाणार आहेत. ५ वाजता रत्नागिरी शहरात पोहोचतील.6 वाजता साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या मैदानावर उद्धव ठाकरे रत्नागिरीमध्ये सभा घेणार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे करण्याचे बाळ माने  राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी हे निवडणूक लढवत आहेत.

4 Nov 2024, 17:26 वाजता

पेण आणि पनवेलमधून ठाकरेंच्या उमेदवाराची माघार नाहीच 

उद्धव ठाकरे यांच्या आदेश देऊनदेखील पेण आणि पनवेल विधानसभेतून ठाकरेंच्या उमेदवारांनी माघार घेतली नाही.मात्र अलिबाग विधानसभेतून ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी माघार घेतली.उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून सुरेंद्र म्हात्रे यांना माघार घेण्याच्या आदेश दिले होते.पेण आणि पनवेल विधानसभेतील उमेदवारांना देखील आदेश दिले असताना त्यांनी माघार घेतली नाही. 

4 Nov 2024, 16:28 वाजता

विक्रमगड विधानसभेत महायुतीत बंडखोरी 

विक्रमगड विधानसभेत महायुतीत बंडखोरी झाली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश निकम यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
त्यांनी शिवसेनेतून जिजाऊ संघटनेमध्ये प्रवेश केला.प्रकाश निकम यांनी जिजाऊ संघटने मधून उमेदवारी अर्ज भरला. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने प्रकाश निकम नॉट रिचेबल होते. विक्रमगड विधानसभेत महायुती महाविकास आघाडी आणि जिजाऊ संघटना असा सामना रंगणार आहे.

4 Nov 2024, 15:41 वाजता

कल्याण पूर्वेत शिवसेने शिंदे गटाकडून बंडखोरी कायम 

कल्याण पूर्वेत शिवसेने शिंदे गटाकडून बंडखोरी कायम आहे. शिंदे गटाचे बंडखोर कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडून बंडखोरी करण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान महेश गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने कल्याण पूर्व विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून भाजप उमेदवार सुलभा गायकवाड ठाकरे गटाकडून धनंजय बोराडे आणि शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.

4 Nov 2024, 15:20 वाजता

बहुजन विकास आघाडीला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

बहुजन विकास आघाडी ला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा.बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे पक्ष चिन्ह देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि सोम सुंदर यांच्या खंडपीठाचे निवडणूक आयोगाला हे आदेश दिले. शिट्टी हे पक्षचिन्ह गोठवल्यामुळे बहुजन विकास आघाडीने  मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावरुन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. दरम्यान चिन्ह पुन्हा मिळाल्यामुळे बहुजन विकास आघाडीत आनंदाचे वातावरण आहे.

4 Nov 2024, 13:49 वाजता

जे ऐकणार नाही त्यांच्यावर कारवाई, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा 

काहीजणांनी वैयक्तिक उमेदवारी अर्ज भरले आहेत. यानंतर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. आज 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. कोणीही एकमेकांच्या विरोधात न लढता एकत्र काम करावे, अशी आमची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू, जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करु, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी कामगार पक्षासोबत चर्चा झाली. अलिबाग, पेण आणि पनवेल येथे शेकाप जागा लढवले. उरणला शेकाप अर्ज मागे घेईल. आणखी काही ठिकाणी आम्हाला सूचना द्यायच्या आहेत, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

4 Nov 2024, 13:48 वाजता

मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचा पाठिंबा

मावळ पॅटर्नला राज ठाकरेंनी ही पाठिंबा दर्शवलाय. हा पॅटर्न सत्यात उतरवण्यासाठी भाजपाचे नेते बाळा भेगडेंनी स्वतः ठाकरेंची भेट घेतली. अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या पराभवासाठी बाळा भेगडे मैदानात उतरलेत. बंडखोर बापू भेगडेंसाठी बापू भेगडे जंग जंग पछाडत आहेत. शरद पवार गटासह सर्व पक्षीयांनी बापू भेगडेंना पाठिंबा दर्शवला आहे. अशातच बाळा भेगडेंनी राज ठाकरेंची भेट घेत, मनसेच्या पाठिंब्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं शेळकेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चाललीये.

 

4 Nov 2024, 13:36 वाजता

जरांगेंच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे

मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात सुरुवात झाली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून करण गायकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार अपक्ष उमेदवारी करण्यासाठी करण गायकर यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जरांगे पाटील यांनी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर करण गायकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून माघार घेतली असली तरी नाशिक-पूर्व मतदारसंघातून मात्र करण गायकर स्वराज्य पक्षाकडूनकडून उमेदवार म्हणून कायम राहणार आहेत.