विशाल करोळे,झी मीडिया,जालना: मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याच्या घोषणेची सर्वच पक्षांनी धास्ती घेतली होती. निवडणूक लढताना तडजोड करावी लागेल हे जरांगे यांचं वाक्य राजकीय पक्षांच्या आशा प्रफुल्लित करणार ठरलं. जरांगेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या दरवाजात राजकीय नेत्यांची रांग लागलीय. खास करून शिवसेना नेत्यांच्या तर भेटींचं सत्रच सुरू झालंय. गेल्या महिन्याभरात उदय सामंत किमान चार वेळा जरांगे यांना भेटले आणि आता आचारसंहितेतही भल्या पहाटे जरांगे यांची भेट घेतली. जरांगे जुने मित्र असल्याचं सामंत सांगू लागलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदय सामंत ही भेट राजकीय नसल्याचं सांगत असले तरीही दुसरीकडे आमची भूमिका जरांगे त्यांच्यासमोर मांडतो,आता जरांगे यांनी पाठिंबा द्यायचा की नाही?  हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलंय. सत्ताधारी नेत्यांप्रमाणंच तिस-या आघाडीचे नेतेही जरांगे यांच्या भेटीला येतायेत. महाशक्तीकडून स्वराज पक्षाचे प्रमुख संभाजीराजे यांनी जरांगे यांची भेट घेतलीय. स्वराज्य  पक्षाकडून उमेदवारांना रिंगणात उतरवा,अशी मागणी संभाजीराजेंनी यावेळी केलीय.


भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनीही जरांगे यांची भेट घेतलीय. मुराठा, मुस्लिम आणि दलित यांची मोट बांधावी.  राखीव आणि खुल्या जागांवर एकमकेकांना पाठिंबा देण्याची ऑफर राजरत्न आंबेडकरांनी  दिलीय. जरांगेंचा पाठिंबा मिळवायचा किंवा जरांगेंचे उमेदवार निवडून येतील त्यांचा पाठिंबा घेण्याची काही पक्षांची रणनिती आहे. त्यामुळं जरांगेकडं संकट म्हणून पाहण्याऐवजी काही राजकीय पक्ष संधी म्हणून पाहत असल्याची चर्चा मराठवाड्यात रंगलीय. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका महायुतीला बसला होता. त्यामुळे विधानसभेत महायुतीतले नेते कोणतीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. गेल्या महिनाभरात उदय सामंत यांनी किमान चार वेळा जरांगे यांची भेट घेतलीय. आता आजही पहाटेच्या वेळी  मंत्री उदय सामंत जरांगेंच्या भेटीला आलेत. ही भेट राजकीय नव्हती असं सामंत यांनी सांगितलं.  


जरांगेचा पाठिंबा घेण्यासाठी राजकीय पक्षांची धावाधाव


मनोज जरांगे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आणि त्याची सर्वच पक्षांनी धास्ती घेतली होती,  मात्र निवडणूक कुणा एका जातीच्या भरोशावर लढता येणार नाही कुठेतरी तडजोड करावी लागेल हे जरांगे यांचा वाक्य राजकीय पक्षांच्या आशा प्रफुल्लित करणार ठरल आहे आणि त्यानंतर जरागे यांच्याकडे भेटीचा ओघ ही वाढला आहे.. खास करून शिंदेसनेकडून तर भेटींचं सत्रच सुरू आहे असं म्हणावं लागेल गेल्या महिन्याभरात उदय सामंत किमान चार वेळा जरांगे यांना भेटले आणि आता आचारसंहितेतही भल्या पहाटे जरांगे यांची भेट घेतली , माझा मित्र आहे म्हणून भेटायला आलो होतो विचारपूस करायला आलो होतो राजकीय नाही असे ते सांगताय, तर दुसरीकडे  आम्ही पक्ष म्हणून आमची भूमिका जरांगे यांच्या कडे मांडतो आणि त्यांनी पाठिंबा दिला तर तो कुणाला नकोय असं संजय शिरसाठ म्हणाले त्यामुळे दोन्ही नेत्यांची ही वेगवेगळी वाक्य काहीतरी शिजतय आहे हे सांगायला पुरेशी आहेत.