Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच राज्यातील राजकीय वर्तुळात देखील मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधाकांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी झी 24 तासच्या टू द पाईंट या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. गद्दारांबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे? जाणून घ्या सविस्तर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दर ठरलाय त्यांना पुन्हा पदरात घेणार नाही'


राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये आठ आमदार आणि दोन मंत्री जे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष सोडून गेले होते ते संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याचा दर ठरलाय त्यांना मला पुन्हा पदरात घेयचं नाहीये. मला माझ्या पक्षामध्ये अशी लोकं नको आहेत. विकली जाणारी आणि विकली गेलेली लोकं मला परत घेयची नाहीत.आता माझ्या शिवसेनेला नवीन उभारी आलेली आहे. पक्षात अनेक तरुण उभे राहिले आहेत. अनेक ठिकाणी बाळासाहेबांच्या वेळीची लोकं यांच्यामुळे कंटाळून गेलेली ती आता परत आली आहेत. त्यामुळे माझी शिवसेना आता जोमात आहे आणि ती लोकं कोमात आहेत. असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


मशाल हे चिन्ह आम्ही पूर्वीदेखील घेतलं होतं. ज्यावेळी छगन भुजबळ आमच्यासोबत होते त्यावेळी देखील आम्ही मशाल चिन्ह घेतलं होतं. त्यामुळे मशाल हे चिन्ह आमच्यासाठी चांगलं आहे. आताच्या काळामध्ये ते चिन्ह अत्यंत योग्य आहे. हे भ्रष्ट आणि गद्दार लोकांना जाळून टाकण्यासाठी मशाल चिन्ह पाहिजे आणि आता ते आमच्याकडे आहे. 


फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर


2014 ला युती मी तोडली नव्हती. एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं होतं तुम्ही फोन करा आणि सांगा युती तोडली. 2019 ला त्यांनी दिलेला शब्द मोडला. माणूस एवढा कसा बिघडू शकतो, हे पाहून मला वाईट वाटलं. त्यांनी माझ्या शब्दाला किंमत नाही दिली, असे ते फडणवीसांबद्दल म्हणाले.