Maharashtra Weather News In Marathi : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह देशातील हवामानातील बदल पाहायला मिळत आहे.  हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार आज (2 मार्च) देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यामध्ये पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध् या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही भागात ही पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे. आज मुंबईचे तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आज मुंबई, ठाण्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 


'या' भागात ऑरेंज अलर्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामान विभागाच्या मते, रविवार आणि सोमवारी उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने येत्या 24 तासांत मध्य प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्ये परिपत्रक आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.


मुंबई, ठाणे पावसाची शक्यता


ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीनंतर शनिवारी सकाळी ही रिमझिम पावसाची शक्यता आहे.दरम्यान गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत अवकाळी पाऊस झाला. दक्षिण मुंबई, अंधेरी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि बोरिवलीसह शहरातील अनेक भागात अचानक पावसाने हजेरी लावली.


मार्च महिन्यात असा असेल उन्हाळा 


मार्च ते मे महिन्यादरम्यान देशातील बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. राज्यातच सर्वसाधारणपणे अनिश्चित परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात पश्चिम मध्य भारत आणि उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पूर्व आणि पूर्व मध्य भारतातील बहुतांश आणि काही भागात तापमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे.


48 तासांत पावसाची शक्यता


येत्या 48 दिवसांत पावसाची हजारी देशाच्या विविध भागात दिसणार आहे.आयएमडीच्या अंदाजानुसार मराठवाड्यासह विदर्भात पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली आहे. गारपिटीमुळे विदर्भातील पिकंच नुकसान झाले आहे. तसेच येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भात पावसाने झोडपण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. नाशिक, बुलढाणा, जालना, हिंगोली परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे.