Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यापासून मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Update) सुरू झालाय. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झालेला पाऊस जुलैच्या सुरुवातीला ओसरलेला पहायला मिळाला. मात्र, आता पावसाने पुन्हा एकदा ऊसंडी मारली आहे. हवामान खात्याकडून आता महाराष्ट्राला येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी अजून पाऊस राज्यात हवा तसा सक्रीय झालेला नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत दिसत होता. अशातच आता राज्यभर मान्सून सक्रिय होण्याची संकेत मिळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधारचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर येत्या तीन दिवसात कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


पाहा ट्विट -



पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या असून बळीराजा आतूरतेने पावसाची वाट पाहत होता, अशातच आता मराठवा़ड्यासह इतरही जिल्ह्यात पावसाने आशीर्वीद देण्यास सुरूवात केली आहे. मुंबईसह उपनगरात पावसानं चांगली हजेरी लावली. पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुधवारी पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


आणखी वाचा - Dudhsagar Waterfall: विकेंडला दूधसागर धबधब्याला जाताय? आधी 'हा' Video पाहाच!


दरम्यान, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तर 19 जुलै रोजी आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4 दिवसात पावसाची शक्यता वाढू शकते.