Weather Updates : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले असून, आता हेच किमान तापमान वाढीस सुरुवात झाली आहे. ज्यामुळं आता महाराष्ट्रातील थंडी काहीशी कमी होताना दिसत आहे. निफाडमध्ये 9.1 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असली तरीही, राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र किमान तापमान 10 अंशांपेक्षा जास्तच असणार आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये रात्रीचं आणि पहाटेचं तापमान वगळता दिवसभर उन्हाचा दाह जाणवरणार आहे. तर, मुंबई, ठाणे आणि पालघरही यास अपवाद ठरणार नाही. थोडक्यात आठवड्याच्या अखेरी थंडी काहीशी कमी असेल असेच संकेत हवामान विभागानं दिले आहेत. 


हेसुद्धा वाचा : Rohit Pawar: रोहित पवारांची तब्बल 8 तास चौकशी; ईडीने 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं


 


देशातील हवामानाची ऐशी की तैशी 


सध्या पर्वतीय भागांमध्ये प्रचंड हिमवृष्टी सुरु असून, देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांच्या मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र पावसानं हजेरी लावल्यामुळं हवामानामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. तिथं दिल्ली एनसीआर परिसरामध्ये तापमानात घट झाली असून मध्येच बरसणाऱ्या पावसाच्या सरींमुळं दिल्लीतीच प्रदुषणाची पातळी काहीशी कमी झाली असून, दृश्यमानताही सुधारली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार शनिवार आणि रविवारीसुद्धा दिल्लीमध्ये पावसाच्या सरी बरसणार आहेत. 


हवामान विभागानं या अवकाळी पावसामची काही कारणंही स्पष्ट केली. 3 फेब्रुवारीपासून पर्वतीय क्षेत्रांमध्ये पश्चिमी झंझावात सक्रीय होत असून, त्याचे थेट परिणाम मैदानी क्षेत्रांमध्ये दिसून येणार आहेत. ज्यामुळं 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान पुन्हा एकदा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. 7 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा धुक्याचं प्रमाण वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जम्मू-कश्मीरच्या गुलमर्ग, अनंतनाग, किश्तवाड़, पुंछ आणि पुलवामा या भागांमध्ये झालेल्या तूफान हिमवृष्टीमुळं ओसाड पडलेल्या डोंगररांगा आता पुन्हा एकदा बर्फाच्या चादरीमुळं कमाल दिसू लागल्या आहेत. तिथं हिमाचल प्रदेशातही चित्र वेगळं नाही. उत्तराखंडमध्येही केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम परिसरामध्ये हिमवृष्टी झाल्यामुळं मंदिर परिसरामध्ये बर्फाचीच चादर पाहायला मिळत आहे. 



दरम्यान, बर्फवृष्टीमुळं या भागांमध्ये आलेल्या पर्यटकांना अद्वितीय अनुभव मिळत असले तरीही हिमवृष्टीच्या तडाख्यामुळं काही अंशी या भागातील जनजीवन विस्कळीत होऊ शकतं असा अंदाजही हवामान विभागान वर्तवत जम्मू काश्मीरमधील 8 जिल्ह्यांना हिमस्खलनाचा इशाराही दिला आहे. (Jammu Kashmir, Himachal Pradesh, Uttarakhand)


हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीचे थेट परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहेत. कुल्लू मनाली आणि सिरमौरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळं अनेक वाहतूक रस्ते बंद झाले आहेत. तर, काही भागांमधील गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, सध्याच्या घडीला हिमाचल प्रदेशातील 566 रस्ते आणि 6 राष्ट्रीय महामार्ग बंद असून काही ठिकाणी पर्यटकही अडकल्याचं वृत्त आहे.