Maharashtra Weather News : ओडिशाच्या किनारपट्टी भागावर दाना चक्रीवादळ आदळलं असून इथं आता वादळाचा लँडफॉल सुरु झाला आहे. इथं वादळ ताशी 120 किमी इतक्या वेगानं धडकल्यामुळं सोसाट्याचा वारा, वादळी पाऊस आणि खवळलेला समुद्र असंच भीतीदायक चित्र पाहायसा मिळत आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये या वादळाचे सर्वाधिक परिणाम दिसत असून, तिथं पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळं सखल भागांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आपत्ती व्यवस्थापन विभागानं सतर्कतेची पावलं उचलली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक रेल्वेसेवा आणि विमानसेवांवरही या चक्रीवादळाचा परिणाम झाला असल्यामुळं प्रवाशांचाही खोळंबा झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रावर या वादळाचा काहीही परिणाम होणार नाही, असं सांगितलं जात असतानाच कमीजास्त प्रमाणात राज्याच्या हवामानावरही वादळाचे परिणाम दिसून येत आहेत. कुठं राज्यातून वादळी पावसाची एक्झिट पाहायला मिळाली असली तरीही, पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


हेसुद्धा वाचा : 'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'


 


सध्या पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतल्यामुळं कमाल आणि किमान तापमानात चढ-ऊतार झाल्याचं चित्र आहे. तर, उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होण्यास सुरुवात झाल्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


मुंबईवर चक्रीवादळाचा 'असा'ही परिणाम... 


ओडिशा आणि पश्चिम बंगालवर धडकलेल्या 'दाना' या चक्रीवादळाचा परिणाम देशातील काही राज्यांसह मुंबईवरही होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. चक्रीवादळाचे दूरगामी परिणाम मुंबईत दिसणार असून, यंदाच्या दिवाळीत राज्यासह शहरात थंडीऐवजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. 



सकाळच्या वेळी कडाक्याचं ऊन आणि सायंकाळच्या वेळीला पाऊस असं एकंदर हवामान पुढील काही दिवस पाहायला मिळले असंही सांगण्यात आलं आहे. चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्यात 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील. दरम्यानच्या काळात गुलाबी थंडीसुद्धा चाहूल देऊन जाणार आहे. दरम्यान, प्रत्यक्षात मात्र 15 नोव्हेंबर रोजी थंडीचं आगमन होणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं हवामानात फारसे बदल न झाल्यास हिवाळा खऱ्या अर्थानं पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे असं म्हणणं गैर नाही.