Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्यानं होणारे बदल नवनवीन समस्य़ा निर्माण करताना दिसत आहेत. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. तर, काही भागांमध्ये मात्र उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केलं आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात पुन्हा एकदा काही मोठे बदल होऊ शकतात असा इशारा वर्तवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागानं स्पष्ट केलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. तर, शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


हलक्या पावसाची शक्यता असली तरीही कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 24 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता असून, राज्यातील अनेक भागांमध्ये हीच स्थिती पाहायला मिळणार आहे.