Mahashtra Weather News : मुंबईत पावसाचं Time Please; मराठवाडा, विदर्भाला मात्र झोडपणार
Mahashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत अविरत बरसणाऱ्या पावसानं मंगळवारी शहरात काहीशी उसंत घेतली. बुधवारीसुद्धा हा पाऊस काहीशा विश्रांतीवरच असणार आहे.
Mahashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली असून, पुढील 24 तासांमध्ये शहरातील काही भागांमध्ये तुरळक सरींची शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त पाऊस अडचणी वाढवताना दिसणार नसल्यामुळं हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आहे. तिथं कोकणात पावसाचा जोर काही अंशी ओसरला असला तरीही अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी मात्र हवेत गारवा निर्माण करणार आहेत.
राज्यातील घाटमाध्यांवर पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळणार असून, विदर्भ आणि मराठवाड्याला मात्र हा पाऊस झोडपताना दिसणार आहे. पश्चिम विदर्भात पावसाचा जोर तुलनेनं जास्त असेल, तर, उर्वरित भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपातील पावसाच्या सरींची बरसात अपेक्षित आहे.
मान्सूनसाठी पूरक असणारा कमी दाबाचा पट्टा सध्या दक्षिणेकडे झुकला असून, परिणामी देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसासाठी पोषक वातावरण असेल. तर, साताऱ्यातील घाट क्षेत्रामध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा : Ashadhi Ekadashi 2024 : कशी होते मानाच्या वारकऱ्यांची निवड?साक्षात विठ्ठलाची महापूजा करण्याचा मिळतो मान
उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्याचील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.