Maharashtra Weather News : नैऋत्य मोसमी पावसानं राज्यातून काढता पाय घेतलेला असतानाच काही भागांमध्ये तापमानवाढीस सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र काही भाग मात्र पावसाच्या सरी झेलताना दिसत आहे. राज्यात आता बरसणारा पाऊस हा मान्सून नसून हा अवकाळी पाऊस असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. पुढील 24 तासांमध्ये हीच स्थिती कायम राहणार असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही काही भागांमध्ये पावसाची हजेरी असून तापमानावर याचे परिणाम होणार असल्याचं सांगण्यात आलं 
आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा किनारपट्टी भागाकडे पुढे येत असून, चेन्नई आणि पुदुच्चेरीपासून हे अंतर साधारण 320 आणि 350 किमी दूर असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या काळात कमी दाबाचं हे क्षेत्र नेल्लोर आणि पुदुच्चेरी जवळ किनाऱ्यावर धडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानाचा विचार करायचा झाल्यास मान्सूननं उघडीप दिली असली तरीही अवकाळी मात्र अडचणी वाढवताना दिसणार आहे. एकिकडे दक्षिण-पश्चिम मान्सूनने आता माघार घेतल्यानंतर आता उत्तर-पूर्व म्हणजे ईशान्य मान्सूननं दक्षिणेकडील राज्यात प्रवेश केला आहे. ज्यामुळं तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची शक्यता असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसून येणार आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Breaking News LIVE : राजकारण ते समाजकारण; दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर 


पुढीलचार ते पाच दिवसांमध्ये मुंबई शहर, उपनगरासह कोकणात मध्यम पावसाची शक्यता आहे. 17 ते 23 ऑक्टोबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असून हा अवकाळीचा तडाखा आता चिंता वाढवण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.