Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्या क्षणापासून राजकीय गणितं आणि डावपेचांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. येणारा प्रत्येक दिवस नवं काहीतरी दाखवून जात आहे. आजच्या दिवशी कोणत्या घडामोडींना असणार महत्त्वं? कोणत्या घडामोडी ठरणार गेम चेंजर? पाहा LIVE UPDATES...
17 Oct 2024, 19:57 वाजता
उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद, जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शुक्रवार दुपारी 12 वाजता शिवालयात पार पडणार आहे. याच पत्रकार परिषदेत उद्या जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता असून कोण किती जागा लढणार याचा फॉर्म्यूला उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
17 Oct 2024, 18:34 वाजता
मंत्री तानाजी सावंतांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाचा हलगर्जीपणा, रिव्हॉल्वरला धक्का लागल्याने घरातच गोळीबार
मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीच्या घरी कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्वरला धक्का लागल्याने घरातच गोळीबार झाला. पुण्यातील धनकवडीतील वनराई कॉलनी भागात ही घटना घडली असून या घटनेत सुरक्षा रक्षक यांचा 13 वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याचे वडील निवृत्त जवान नितीन हनुमंत शिर्के यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
17 Oct 2024, 17:17 वाजता
मुंबई जिंकता येत नसल्यानं मुंबई अदानींच्या घशात घातली जातेय - आदित्य ठाकरे
मुंबईत आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यात त्यांनी विरोधकांवर आरोप केला की मुंबई जिंकता येत नसल्यानं मुंबई अदानींच्या घशात घातली जातेय. ते पुढे म्हणाले, 'पालिकेची कॉफर्ड मार्केटमधील शिवाजी महाराज मंडई, वरळीतील अस्फाल्ट प्लांट आणि मलबार हिलमधील पॉवर स्टेशनची जागा लिलावात काढली जातेय.आम्ही पालिकेत असताना 92 हजार कोटींच्या मुदतठेवी वाढवल्या. परंतु आता पालिका दीड ते दोन लाख तुटीत गेली आहे. पालिकेच्या जागांचा लिलाव सुरू केलाय'.
'भाजपवाले आणि शिंदे हुतात्मा स्मारकही लिलावात काढतील. पालिका विकण्याचे काम सुरू आहे. लिलावाचा अधिकार यांना दिला कुणी... आचारसंहितेत कुणाला काय परवानगी आहे ते निवडणूक आयोगाने सांगावे. अनेक ठिकाणी पोस्टर आहेत. रेल्वेत जाहीराती सुरू आहेत. माझा लढा हा महाराष्ट्राची लूट करणा-यांविरोधात आहे', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
17 Oct 2024, 16:26 वाजता
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी उद्या जाहीर होणार
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी उद्या शुक्रवारी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाव अपेक्षित असलेल्या उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या असून उमेदवारांना निवडणुकीसाठी कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत 100 पेक्षा अधिक जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
17 Oct 2024, 14:53 वाजता
रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल, बुकींग कालावधी केला कमी
रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून बुकींग कालावधी कमी करण्यात आला आहे. आता दोन महिन्याआधीच आरक्षण करता येणार असून रेल्वेचा हा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. यापूर्वी चार महिन्याआधी तिकीट बूकींग करता येऊ शकत होतं. ज्यांनी 1 नोव्हेंबरपूर्वी बुकिंग केलंय त्यांचे आरक्षण कायम राहणार आहे. प्रवासी 31 ऑक्टोबरपर्यंत 120 दिवसांच्या आत प्रवासासाठी आरक्षण करू शकतात, परंतु त्यानंतर नवीन नियम लागू होईल.
17 Oct 2024, 14:44 वाजता
ठाकरे गटातून पहिली उमेदवारी जाहीर, वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाईंचे नाव निश्चित
विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकला जाहीर होणार आहेत. ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली असून शिवसेना नेते अनिल परब यांनी वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाईंचे नाव निश्चित झाल्याची माहिती दिली आहे. बुधवारी गटप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी वरूण सरदेसाईंचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले.
17 Oct 2024, 13:03 वाजता
लाडकी बहीण किंवा नारी सन्मान योजना ही आमचीच योजना आहे- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षाची चर्चा सुरु आहे, जेव्हा ती चर्चा संपेल तेव्हा आम्ही अधिकृतपणे घोषणा करू. लाडकी बहीण किंवा नारी सन्मान योजना ही आमचीच योजना आहे, कर्नाटकाच्या झालेल्या निवडणूकीत आम्ही 2000 रुपये देण्याच जाहीर केलं होतं. आमचं सरकार आल आम्ही देतोय तेलणगांत सुध्दा आम्ही देतोयच, त्यामुळे महायुतीने जरी 1500 दिले नसते तरी आम्ही करणारच होतो आता 2000 केलं पाहिजे, असं आम्हाला वाटतंय यांनी कंजूशी का केली 1500 का दिल मला माहिती नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
17 Oct 2024, 12:11 वाजता
सिडकोच्या भूखंड विक्रीला अल्प प्रतिसाद , जाहीर गृहप्रकल्पमद्ये शिल्लक घरांचा समावेश
सिडकोने माझे पसंतीचे घर या योजनेअंतर्गत 26 हजार घरे विक्री साठी उपलब्ध करून दिली आहेत, या घराची ऑन लाईन नोंदणी ला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी ही घरे विकण्यासाठी सिडकोला मेहनत घ्यावी लागणार आहे ,26 हजार घरांमद्ये 13 हजार घरे आर्थिक दुर्बळ घटकांसाठी आणि 13 हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत ,यातील 50 टक्के घरे एकट्या तळोजात आहेत. तसेच खांदेश्वर ,खारकोपर, बामणडोंगरी , मानसरोवर येथील काही शिल्लक घरांचा समावेश आहे , तसेच या घराच्या किमती सिडको ने जाहीर केल्या नाही आहेत , त्यामुळे किंमती कळल्यानंतर ग्राहकांची पसंती कळणार आहे, सिडको च्या घरांप्रमाणे सिडको च्या भूखंड खरेदी कडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे , नुकत्याच जाहीर झालेल्या 47 व्यावसायिक आणि रहिवासी भूखंड विक्री मद्ये फक्त 15 भूखंडांना नागरिकांनी प्रतिसाद दिला.
17 Oct 2024, 11:35 वाजता
महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार
सोलापुरात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.. MIM सोलापूर शहरातील चार विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत. सोलापुरातील मुस्लीमबहुल मतदारसंघात MIM मैदानात उतरणार आहे. सोलापूर शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण सोलापूर तसंच अक्कलकोटमध्ये MIM उमेदवार उभे करणार आहे.. यातील सोलापूर शहर मध्यमधून शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांची उमेदवारी घोषित करण्यात आलीये. तर इतर तीन मतदारसंघातील उमेदवारांची लवकरच घोषणा केली जाणार आहे.
17 Oct 2024, 11:01 वाजता
CAA संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
CAA कायदा वैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानुसार 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971 दरम्यान बांगलादेशातून आलेल्या अप्रवासी नागरिकांना भारतीय नागरिकत्वं मिळू शकतं. ज्यांना या कायद्याअंतर्गत नागरिकत्वं मिळालं आहे त्यांचा हा हक्क अबाधित राहणार आहे.