Maharashtra Weather News : मुंबईत पावसाची विश्रांती; ठाणे, कोकणात काय परिस्थिती?
Maharashtra Weather News : राज्यात सुरू असणारा पाऊस आता विश्रांती कधी घेणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...
Maharashtra Weather News : रविवारपासून सुरू झालेल्या पावसानं सोमवार आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला, याच धर्तीवर मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईभर पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज असून, मुंबईसह ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर पालघरसाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची वर्तवण्यात आली आहे. असं असलं तरीही सध्या मात्र मुंबई शहरामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतल्यामुळं कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे.
मुंबईप्रमाणं ठाण्यातही अतिवृष्टी विचारात घेऊन हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभुमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ 1 ली ते 12 च्या सर्व माध्यमाच्या / मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून केडीएमसी कडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी व आवश्यक ती खबरदारी म्हूणन सुट्टी जाहीर केली आहे.
हेसुद्धा वाचा : जोरदार पावसामुळे मुंबईची दैना! रेल्वे सेवा विस्कळीत तर रस्त्यांवर साचलं पाणी
सध्याच्या घडीला पावसानं उघडीप दिली असली तरीही बुधवारच्या पावसामुळं मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये रुळावर पाणी साचल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली होती. सखल भागात पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. गुरुवारी मात्र कोकणासह बहुतांश भागांमध्ये काळ्या ढगांचं सावट वगळता पावसाच्या सरींचा जोर ओसरला आहे. पुढील 24 तासांमध्ये ही परिस्थिती कायमच राहणार असून, किनारपट्टी क्षेत्रामध्ये पावसाच्या तुरळक सरी वगळता उर्वरित भागांमध्ये पाऊस दडी मारताना दिसेल.